मोठी बातमी! आरेतील वृक्षतोडीवर सर्वोच्च न्यायालयाची तूर्तास स्थगिती; पुढची ‘तारीख पे तारीख’ १० ऑगस्टला

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) राज्य सरकारने आरेतील कामाला देण्यात आलेली स्थगिती उठविल्यानंतर एमएमआरसीने (MMRC) मेट्रो ३ च्या गाडीचे डबे आणण्यासाठी अडचण ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केली. या छाटणीच्या नावाखाली आरेत झाडे अवैधरित्या कापल्याचा आरोप पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केला होता.

  • पुढील सुनावणीपर्यत एकही झाड कापण्यास मनाई

मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी (Metro 3 Project Car Shed) आरे दुग्ध वसाहतीतील (Aarey Dairy Colony) वृक्ष तोडण्याविरोधात (Tree Cutting) पर्यावरणप्रेमींनी (Environmentalist) केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पुढील सुनावणीपर्यंत (Tarikh Pe Tarikh) आरेतील एकही झाड कापू नये असे निर्देश राज्य सरकारला (Maharashtra Government) दिले.

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) राज्य सरकारने आरेतील कामाला देण्यात आलेली स्थगिती उठविल्यानंतर एमएमआरसीने (MMRC) मेट्रो ३ च्या गाडीचे डबे आणण्यासाठी अडचण ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केली. या छाटणीच्या नावाखाली आरेत झाडे अवैधरित्या कापल्याचा आरोप पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केला होता.

आरेतील झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना झाडे कापण्यात आल्याचा आरोप करून पर्यावरणप्रेमीनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी न्या. उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड कापू नये, असे आदेश राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ला दिले असून सुनावणी १० ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.