तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेसाठी चाैरंगी लढत? शिंदे गट शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन समाज पार्टी, आरपीआयचा दावा

काँग्रेसची जनसंवाद यात्रा, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा आणि आता शिवसेनेने सुरू केलेले 'होऊ द्या चर्चा' मोहिमेने तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीतील शरद पवारांचा गट व शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट अद्याप शांत आहे. निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या मोहिमा आखत मैदानावरील स्थितीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे.

    कवठेमहांकाळ : काँग्रेसची जनसंवाद यात्रा, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा आणि आता शिवसेनेने सुरू केलेले ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेने तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीतील शरद पवारांचा गट व शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट अद्याप शांत आहे. निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या मोहिमा आखत मैदानावरील स्थितीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसह त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. सर्वच पक्षांच्या राजकीय यात्रा व अभियानांमध्ये राज्य व देशपातळीवरील विषयांवर चर्चा झडत आहेत. स्थानिक प्रश्नांचा ऊहापोह होताना दिसत नाही. तरीही या माध्यमातून मतदारांवर आपापल्या भूमिका बिंबविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन अभियान सुरू करण्यात आले आहे.
    कवठेमहांकाळ तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, भाजपाचे विधानसभा अध्यक्ष खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील, शिवसेना शिंदे गटाचे अमोल ओलेकर यांनी शड्डू ठोकला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे हे देखील मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे. चैरंगी लढतीची चर्चा सध्या रंगली आहे.तरीही पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून निवडणुकांच्या निमित्ताने तयारी सुरु झाली आहे. एकापाठोपाठ एक राजकीय अभियान आता सुरू झाले आहे.

    शिवसेना शिंदे गट गेल्या अनेक महिन्यांपासून शांत होता. आता तोही सक्रीय झाला आहे. सरकारच्या विविध धोरणांचा निर्णयांचे स्वागत करण्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली आहे.तासगावच्या दोन युवा नेत्यांनी कामाचा जोर वाढवला असताना दुसरीकडे कवठेमहांकाळ तालुक्यातील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा गट सावध बनला आहे. घोरपडे गटाकडे काही ग्रामपंचायती, विकास सोसायट्या आहेत. त्यांचे पुत्र शेतकरी विकास आघाडीचे युवा नेते राजवर्धन घोरपडे हे देखील मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत. त्यांनी भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी समर्थक आग्रह करत आहेत.

    घोरपडे कोणती भूमिका घेणार?
    रोहित व प्रभाकर हे दोन्ही तासगावचे उमेदवार असतील. परंतु या मतदारसंघात कवठेमहांकाळला दुय्यम स्थान मिळते. मग कवठेमहांकाळचा आमदार पाहिजे यासाठी राजवर्धन व शिवसेना शिदें गटाचे अमोल यांच्या उमेदवारीसाठी त्यांचे समर्थक प्रयत्न करत आहेत. मात्र अजितराव घोरपडे हे कोणती भूमिका घेणार? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

    स्थाानिक नेत्यांकडूनतयारी
    रोहित आणि प्रभाकर पाटील शिंदे गटाचे अमोल ओलेकर यांच्याबरोबर राजवर्धन यांच्या नावाची चर्चा असताना कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये युवा नेते शंतनू सगरे हे सध्या तटस्थ आहेत. या गटाची भूमिकाही महत्त्वपूर्ण असणार आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून निवडणुकांच्या निमित्ताने तयारी सुरु झाली आहे.