तासगाव हादरले! फटाके- दारू गोडाऊनला भीषण आग ; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

भर वस्तीत असणंऱ्या सोमवार पेठेत असणाऱ्या महेश सुरेश कोकणे याच्या फटाके तयार करण्यासाठी लागणाऱ्या दारूच्या गोडावून भीषण आग लागली.या आगीत जीवित हानी झाली नसली तरी मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.वेळी अग्नीशमन यंत्रणा घटना स्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.

    तासगाव : येथील भर वस्तीत असणंऱ्या सोमवार पेठेत असणाऱ्या महेश सुरेश कोकणे याच्या फटाके तयार करण्यासाठी लागणाऱ्या दारूच्या गोडावून भीषण आग लागली.या आगीत जीवित हानी झाली नसली तरी मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.वेळी अग्नीशमन यंत्रणा घटना स्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.

    याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, महेश कोकणे याचे सोमवार पेठेत फटाके तयार करण्यासाठी लागणाऱ्या दारूचे गोडावून आहे.महेश कोकणे याचा अन्य दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना दारू पुरवितात. ते या गोडाऊन मध्ये दारू तयार करतात .शिवाय याच ठिकाणी त्याचा साठा करून ठेवतात.कोकणे याचे हे दारूचे गोडावून शहराच्या मध्यवस्तीत आहे.

    सोमवारी येथील याच सोमवार पेठेत आठवडा भाजी बाजार भरतो.तो सायंकाळी उशिरा पर्यत सुरू असतो त्यामुळे या भागात नागरिक , महिला याची ये जा असते.सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमरास कोकणे याच्या गोडावून मधील दारूला आग लागली.दारू अतिशय स्फोटक असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच तहसीलदार रवींद्र रांजणे , पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ , पालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील हे आपल्या फौज फाट्यासह घटना स्थळी दाखल झाले.तासगाव पालिकेच्या दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.घटनेचे गांभीर्य ओळखून अग्नी शमन जवानांनी रस्ता अपुरा असतानाही मोठया प्रयत्नाने आगीला सामोरे जाण्याची प्रयत्न केला. गोडावून मध्ये मोठया प्रमाणात दारू साठा असल्याने अधून मधून दारूचे मोठे स्फोट होत होता.घटना स्थळी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केल्याने आग विझवीण्यासाठी अडचण येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांना गर्दी पागविण्यासाठी कडक भूमिका घ्यावी लागली. आगीचे रौद्र रूप लक्षात घेऊन सांगली , विटा आणि चितळे डेअरी याच्या अग्नी शमन गाड्या मागविण्यात आल्या.रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नी शमन जवानांना यश आले. शहराच्या मध्यवस्तीत हे गोडावून असल्याने आणि बाजार पेठेत ही घटना घडल्याने प्रशासनाची मोठी कसोटी लागली होती.