Pune Railway Station
Pune Railway Station

  पुणे : रेल कोच रेस्टॉरंट हा भारतीय रेल्वेचा एक अभिनव उपक्रम आहे. ज्याने अनेक राज्यांतील प्रवासी आणि लोकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. पुणे रेल्वे विभागावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह यांचे मार्गदर्शनात तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांचे नेतृत्वात रेल्वे कोच रेस्टॉरंट दिनांक 22 नोव्हेंबरपासून पुणे स्थानक येथे सुरू करण्यात आला आहे, जो पुणे विभागातील अशा प्रकारचा दुसरा रेस्टॉरंट आहे.
  वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे आणि अन्य रेल्वे अधिकारी यांच्या बरोबरच हल्दीराम-नागपूरचे संचालक नीरज अग्रवाल आणि हल्दीरामचे उपव्यवस्थापक अमोल भगत यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. नीरज अग्रवाल यांच्या हस्ते फीत कापण्यात आली आणि  त्यानंतर रेस्टॉरंट च्या सेवा सुरू  करण्यात आल्या.
  रेल्वे कोच रेस्टॉरंट 100 चौरस मीटर क्षेत्रफळावर
  पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे कोच रेस्टॉरंट 100 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधण्यात आले असून, ताडीवाला रोड परिसरात  पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाजवळ आहे. रेस्टॉरंट ऑन व्हील्स (ROW) चे व्यवस्थापन आणि संचालन OAM Industries India Pvt.  लिमिटेड (हल्दीराम्स) यांचेकडून केले जात आहे.
  10 टेबलांसह कोचमध्ये 40 लोकांना सामावून घेण्याची क्षमता
  जवळपास सर्व खानपान गरजा पूर्ण करणारे स्वादिष्ट अन्न 24 x 7 येथे मिळेल. वातानुकूलित रेस्टॉरंट जेवणासाठी एक अनोखा अनुभव देणारे उत्तम जेवणाचे ठिकाण आहे आणि 10 टेबलांसह कोचमध्ये 40 लोकांना सामावून घेईल.  रेस्टॉरंटचे इंटेरियर अशा प्रकारे सजवले गेले आहे की प्रवासी तसेच लोक जेवणाचा आनंददायी अनुभव घेऊ शकतील.
  ऑनलाइन फूड ऑर्डरिंग ॲप्स द्वारे घेता येणार
  टेक अवे काउंटर प्रवाशांना त्यांच्या ऑर्डर त्वरित मिळवण्यास आणि वेळेवर त्यांच्या इच्छित गाडीत चढण्यास मदत करेल.  या सुविधेचा लाभ विविध ऑनलाइन फूड ऑर्डरिंग ॲप्स द्वारे घेता येईल.  येथे राज कचोरी, छोला भटुरा, पाव भाजी, व्हेज थाली आणि कॉम्बो, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, पॅक स्वीट्स आणि नुमकीन, चाट, शीतपेये, सॉफ्टी, पारंपारिक भारतीय मिठाई इत्यादींसह उत्पादनांची विस्तृत श्रेणी प्रस्तुत करते.
  रेल्वेला दरवर्षी 60,00,000/- रुपयांचा महसूल
  या करारामुळे रेल्वेला दरवर्षी 60,00,000/- रुपयांचा महसूल मिळणार आहे आणि पुणे शहरातील प्रवाशांना आणि जनतेला खाद्यान्न सेवा  उपलब्ध होणार आहे. पुणे विभागातील चिंचवड स्टेशनवरील पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील्स  लोकांना खानपान सुविधा  पुरवत आहे.  याशिवाय आकुर्डी, बारामती आणि मिरज स्थानकात अशा प्रकारचे  रेस्टॉरंट ऑन व्हील बसवण्याचे नियोजन असून ते बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
  विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी यांचा बाइट – “कोच रेस्टॉरंट केवळ प्रवाशांनाच नव्हे तर सर्वसामान्यांसाठीही स्वच्छ आणि स्वादिष्ट भोजन प्रदान करेल.  हल्दीरामद्वारे चालवले जाणारे हे कोच रेस्टॉरंट आजूबाजूच्या परिसरातील तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण असेल कारण ते चोवीस तास सेवा प्रदान करेल.