या व्यवस्थेचं करायचं काय? राणीबागेतील चहा पडतोय महाग!, रिकाम्या कपाचेही मोजावे लागतात ०५ रुपये

येथे वीस रुपयांपासून तर ९९ रुपयांपर्यंत किंमतीचा चहा येथे विकला जात आहे. तर कटिंगची सोय उपलब्ध नसून रिकामा कप मागितल्यास याचे बिल न देता एका कपासाठी पाच रुपये मागितले जात असलयाने या लुटमारीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी पर्यटक व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    मुंबई : मुंबईसह (Mumbai) देश विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र (A Center Of Attraction For Tourists From All Over The Country) असलेल्या महापालिकेच्या (BMC) वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणीबाग) येथील चहाची चांगली चर्चा रंगताना दिसत आहे कारण येणाऱ्या पर्यटकासह कर्मचाऱ्यांना येथील चहा चांगलाच महाग पडत आहे.

    कारण येथे वीस रुपयांपासून तर ९९ रुपयांपर्यंत किंमतीचा चहा येथे विकला जात आहे. तर कटिंगची सोय उपलब्ध नसून रिकामा कप मागितल्यास याचे बिल न देता एका कपासाठी पाच रुपये मागितले जात असलयाने या लुटमारीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी पर्यटक व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. लवकरच संचालकांकडे याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

    भायखळ्यातील राणीबागच्या पर्यटकांच्या संख्येमध्ये तेथील होणाऱ्या बदलांमुळे वाढ झाली आहे. पर्यटकांना राणीबागेमध्ये खाद्यपदार्थ व अन्य वस्तू देण्यात बंदी असल्यामुळे त्यांना आत असलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवरच खाद्यपदार्थ, कोल्ड्रिंक, चहा विकत घ्यावा लागतो. कागदी कपातून देण्यात येणाऱ्या साध्या चहाची किंमत २० रुपये ठेवण्यात आली आहे.

    मोकळा कप मागितला तर कोणतेही बिल न देता ०५ रुपये मागितले जातात. तर तर अनेक पर्यटक कटिंग चहाची मागणी करत असून पण स्टॉलधारकांकडून त्याला नकार देण्यात येतो. त्यामुळे पर्यटक रिकाम्या कपाची मागणी करतात. पण स्टॉलधारकाकडून रिकाम्या कागदी कपाचेही पैसे घेण्यात येतात.

    बाजारात जेमतेम ५० पैशाला मिळणारा हा कप ०५ रुपये घेऊन पर्यटकांना दिला जातो. त्यामुळे एका चहाच्या कपाची किंमत सरासरी २५ रुपये इतके होते. त्यामुळे ही लूट योग्य नसल्याचे भाजपाचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांच्याकडून सांगण्यात आले.

    राणीबागेतील पेंग्विन कक्षात द चाय कॅफे या स्टॉलवर स्पेशल चहाची किंमत ४० रुपयाच्या घरात असून लेमन आईस चहासाठी ९९ रुपये मोजावे लागतात. येथेही ग्राहकाने अतिरिक्त कागदी कपाची मागणी केली तरी त्याच्याकडून पैसे घेण्यात येतात.

    येथे कॉफीचेही वेगवेगळे प्रकार असून त्याच्या किमतीही ४० रुपये ते १०० रुपये पर्यंत आहेत. यात कोल्ड कॉफीची किंमत ९९ रुपये आहे. राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांमध्ये अनेक पर्यटक हे सर्वसामान्य असतात त्यामुळे त्यांना चहाचे महागडे दर परवडत नाही. राणीबागेतील कर्मचाऱ्यांनाही पर्यटकांप्रमाणे चहाचे दर मोजावे लागत आहेत.

    मुंबईत अनेक ठिकाणी आठ ते दहा रुपयांमध्ये कटिंग चहा मिळतो. असे असताना राणीबागेत एवढा महागडा चहा का विकला जातो, असा प्रश्न पर्यटकांनी उपस्थित केला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वस्तामध्ये चहा व खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.

    मात्र याबाबत या स्टॉल मधील चहा विक्रेत्यांची बोलल्या असता यात राणीबाग प्रशासनाकडून आम्हाला काही निर्देश देण्यात आलेले नाहीत मात्र यासाठी कंत्राटदाराने दिलेल्या नियमांचे आम्हाला पालन करावे लागते अशी उत्तरे देण्यात येत आहेत.

    कर्मचाऱ्यांना द्या कमी किमतीत चहा आणि खाद्य पदार्थ:

    लवकरच संचालकांकडे कंत्राटदाराची तक्रार

    महापालिका मुख्यालयात देखील अन्न पदार्थाच्या किमती कमी आहेत. मग राणीबागेत देखील कमी किमतीत अन्नपदार्थ आणि चहा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    या कंत्राट दाराबाबत आम्ही संचालकांकडे तक्रार देखील करणार आहोत असे कर्मचारी सांगतात हा प्रकार अजून संचालकांपर्यंत आम्ही पोहोचवलेला नाही संचालकांकडून आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली

    अशी देतात येथे काम करणारे कर्मचारी उत्तरे

    तेथील कर्मचारी कर्मचारी सांगतात की, राणीबाग प्रशासनाकडून आम्हाला निर्देश देण्यात येत नाहीत तर आम्हाला आमच्या कंत्राटदारांनी दिलेल्या आदेशांचे पालन करावे लागते. त्यामुळे जर अशी उत्तरे पर्यटकांना देण्यात येत असतील तर राणीबाग प्रशासनाने या प्रश्न लक्ष घालण्याची गरज आहे.