
बालाजी पेटकर म्हणाले की, मी अनकेदा खडूवर गणपती कोरल्याचे पाहिले. खडूबरोबरच साबणावर गणपतीची प्रतिमा तयार करण्याचा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी साबणावर देवांची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रयत्न केले.
नांदेड : एका कला शिक्षकाने देखील आपल्या आगळ्यावेगळ्या कलेची छाप पाडली आहे. या नांदेडच्या (Nanded) या शिक्षकाने चक्क साबणावर गणपतीसह वेगवेगळ्या देवी देवतांच्या मुर्ती तयार करण्याचा छंद जोपासला आहे. बालाजी पेटकर (Balaji Petkar) असं या शिक्षकाचे नाव आहे. त्यामुळे त्यांच्या कलेची परिसरात जोरदार चर्चा आहे. तर, त्यांनी तयार केलेल्या मूर्ती आकर्षणाचा विषय बनला आहे.(Ganeshotsav 2023)
बालाजी पेटकर हे बिलोली तालुक्यातील खतगाव येथील रहिवासी आहेत.ते देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील शिवशंकर माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या बारा वर्षांपासून ते साबणावर देवी देवतासह महामानवाच्या मूर्ती साकारत आहेत. त्यांनी गणपती, शिव पार्वती, राधाकृष्ण, तिरुपती बालाजी, साईबाबा यासह गौतम बौद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, माँ जिजाऊ, अहिल्याबाई होळकर आदि महापुरुषांच्या मूर्ती साबणावर साकारल्या आहेत. साधारणपणे 40 हुन अधिक मूर्ती तयार केल्याचं पेटकर यांनी सांगितलं. कलाध्यापक असलेल्या बालाजी पेटकर हे रोजच वेळ मिळेल तेव्हा मुर्त्या तयार करण्याचे काम करत असतात. त्यांच्या साबणापासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती पंचक्रोशीत आकर्षणाचा विषय बनला आहे.
बालाजी पेटकर शिक्षक असल्याने त्यांच्या बहुतांश वेळ नोकरीत जातो. मात्र नोकरी करतानाच पेटकर यांनी आपल्या छंदाला देखील वेळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 12 वर्षांपूर्वी साबणावर मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 40 पेक्षा अधिक मूर्ती तयार केल्या आहेत. विशेष बारीक कोरीव काम करून ही मूर्ती तयार करावी लागते. त्यामुळे थोडी देखील चूक झाल्यास पुन्हा नव्याने कोरीव काम करावे लागते. त्यामुळे पेटकर यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
बालाजी पेटकर म्हणाले की, मी अनकेदा खडूवर गणपती कोरल्याचे पाहिले. खडूबरोबरच साबणावर गणपतीची प्रतिमा तयार करण्याचा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी साबणावर देवांची प्रतिमा तयार करण्यासाठी प्रयत्न केले. यात मला यश आले आणि आजपर्यंत जवळपास अशा 40 प्रतिमा मी तयार केल्याचे पेटकर सांगतात. तसेच हा माझा छंद असून, मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मी साबणावर गणेश प्रतिमा तयार करतो, असंही ते म्हणाले.