संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

जुनी पेन्शन (Old Pension Scheme) या एकमेव मागणीसाठी दिल्ली होणाऱ्या शंखनाद आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी तसेच विविध विभागातील अधिकरी, कर्मचाऱ्यांसह शिक्षक व प्राध्यापक दिल्लीसाठी रवाना झाले. 'एकच मिशन, जुनी पेन्शन' अशा घोषणा देत कर्मचारी सहभागी झाले होते.

    जालना : जुनी पेन्शन (Old Pension Scheme) या एकमेव मागणीसाठी दिल्ली होणाऱ्या शंखनाद आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शिक्षक व प्राध्यापक दिल्लीसाठी रवाना झाले. ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशा घोषणा देत कर्मचारी सहभागी झाले होते.

    दिल्ली येथील रामलीला मैदानावर हे आंदोलन होत आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे संगठन सचिव पंजाब राठोड, जुनी पेन्श संघटना अध्यक्ष फारूख शहा, सचिव नितीन चव्हाण, नितीन डोंगरे, रोहित मरस कोल्हे, भारत राठोड इत्यादींसह 20 ते 25 कर्मचारी रवाना झाले आहेत.

    यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अनंत जायभाये, मनोहर कापगते, रंजनकुमार डे, राहुल पशिने, कैलास चव्हाण, राजन सव्वालाखे, राजू चव्हाण यांच्यासह प्राथमिक शाळा व नगर परिषद शाळा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.