Teachers get relief from being extra! Last year's setup will now be maintained

शासनाकडून मागील वर्षीच्या संचमान्यतेला कायम ठेवण्यात आले असले तरी जिल्ह्यात अतिरीक्त शिक्षक आहेत. तेव्हा आता शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होताच अतिरीक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

  गोंदिया : शासनाच्या शालेय क्रीडा विभागाच्या (school sports department) वतीने यंदाच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरीता (Education year 2020-21) मगील सन २०२०-२१ या वर्षीचीच संचमान्यता कायम राहणार असल्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी राज्यात एकही शिक्षक व कर्मचारी अतिरिक्त होणार नाही. त्यातच या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याबरोबरच त्यांचे आधार कार्ड अद्यावत ( Adhar Card Link ) करण्याच्या सूचना दिल्या आहे. तेव्हा यंदाच्या वर्षी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना अतिरीक्त होण्यापासून दिलासा मिळालेला आहे.

  राज्यात कोरोनाच्या ( Corona ) संक्रमणामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे आभासी पध्दतीनुसार विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत होते. प्रत्यक्षात पटावर विद्यार्थी अधिक असले तरी आधार अध्यावत नसल्याने आधार मिसमॅच (Adhar Missmatch) मुळे स्कूल पोर्टलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत नव्हती, परिणामी संच मान्यता २०२१-२२ मध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या फारच कमी दिसत होती.

  त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, राज्यभर संच मान्यतेबाबत निर्माण झालेल्या घोळाबाबत विविध संघटनेच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. ज्याची दखल घेत शासनाने परिपत्रक निर्गमित करून सन २०२१-२२ ची संचमान्यता ही सन २०२०-२१ प्रमाणेच कायम असेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षकांना आता शाळेतील पटसंख्या वाढविण्याची व आधार कार्ड अद्ययावत ( Adhar Card Link )करण्याची संधी मिळाली असून अतिरिक्त होण्यापासून दिलासाही मिळाला आहे.

  शिक्षक बदली प्रक्रियेला सुरुवात

  एकीकडे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत करता यावे, यासाठी शिक्षण विभागाकडून मागील वर्षीच्या सन २०२०-२१ च्या संच मान्यतेला यंदाच्या सन २०२१-२२ या वर्षात कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असता याच संच मान्यतेच्या आधारावर गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ३३० शिक्षक असून तीन सत्रात ही प्रक्रिया पूर्ण होणार, ज्यामध्ये पात्र शिक्षक, संवर्ग-१, संवर्ग-२ असे ठरवून बदली प्रक्रीया पूर्ण केली जाईल. या अनुषंगाने सद्यास्थितीत शिक्षकांकडून प्रोफाइल अपडेटचे ( profile Update ) काम करण्यात येत आहे.

  बदलीनंतर समायोजन

  शासनाकडून मागील वर्षीच्या संचमान्यतेला कायम ठेवण्यात आले असले तरी जिल्ह्यात अतिरीक्त शिक्षक आहेत. तेव्हा आता शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होताच अतिरीक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

  नितेश खंडेलवाल, समन्वयक, (प्राथ.) शिक्षण विभाग, जि.प. गोंदिया (Nitesh Khandelwal, Coordinator, (Primary) Department of Education, Z.P. Gondia)