शिक्षक भारती संघटनेची माघार ; सुजीत काटमोरेकडून दिशाभूल , खासदार महाडिक यांनी घातले प्रकारणात लक्ष

माध्यमिक शिक्षण विभागातील वेतनअधिक्षक यांच्यावर अनियमेतेचा आरोप करणाऱ्या शिक्षक भारती संघटनेनी चौकशी सुरु होण्या आगोदरचं समिती समोर विनंती करीत माघार घेतली आहे. शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजीत काटमोरे यांची भूमिका संशायस्पद असून ते प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रसाद मसरे यांनी केला आहे.

    सोलापूर : माध्यमिक शिक्षण विभागातील वेतनअधिक्षक यांच्यावर अनियमेतेचा आरोप करणाऱ्या शिक्षक भारती संघटनेनी चौकशी सुरु होण्याअगोदरचं समिती समोर विनंती करीत माघार घेतली आहे. शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजीत काटमोरे यांची भूमिका संशायस्पद असून ते प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रसाद मसरे यांनी केला आहे. तर लिपीक संजय बानूर यांच्या समर्थनार्थ खासदार धनंजय महाडिक आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह ११ शिक्षक संघटनेनी संजय बानूर यांना माध्यमिक शिक्षण विभागात नियुक्ती देण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

    यात पार्श्वभूमी अशी की,  ५ स्पटेंबर रोजी शिक्षक भारती संघटनेने माध्यमिक वेतन पथकाचे तत्कालीन अधीक्षक विठ्ठल ढेपे व लिपिक संजय बानूर यांच्या विरोधात उपोषणदवारे लक्षवेधी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेत वेतन अधिक्षक यांच्यासह लिपीक बानूर यांच्यावर चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली. मात्र वेतनअधिक्षकांवर चौकशी सुरू होण्या अगोदरचं शिक्षकभारती संघटनेनी माघार घेतल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.माध्यमिक शिक्षण विभागातील कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबीत राहात असल्याने शिक्षक ओरड होण्यास सुरुवात झाली आहे.माध्यमिक शिक्षणधिकारी तृप्ती अंधारे यांनी अनूभवी लिपीक कार्यालयास देण्याची मागणी झेडपी प्रशासनाकडे केली आहे.

    ५ ऑक्टोंबर रोजी वेतनअधिक्षक यांच्या समवेत आमची चर्चा झाली. थकीत देयके अनूदान मंजूर झाल्यावर नियमानुसार अदा करण्याचे आश्वासन लेखी पत्राद्वारे संघटनेला दिल्यामूळे सीईओ यांच्याकडे वेतनअधिक्षक यांच्या विरोधातील तक्रार माघार घेण्याची पत्रादवारे विनंती केली आहे.

    सुजीत काटमोरे,जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

    सूजीत काटमोरे शिक्षक भारती संघटने द्वारे झेडपी प्रशासनाची दिशाभूल करीत आहेत. अनूभवी लिपीक माध्यमिक शिक्षण विभागात नसल्यामुळे शिक्षकांची कामे प्रलंबीत राहत आहेत.

    प्रसाद मसरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना