
पुणे जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यापासून चव्हाण हे सर्व तालुक्यांमध्ये दौरा करीत आहेत. नुकताच त्यांनी भोर तालुक्याचा दौरा केला. त्यामध्ये ससेवाडी शाळेत शिक्षकच हजर नसल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ कारवाईचा आदेश दिला.
पुणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रमेश चव्हाण यांनी भोर तालुक्यातील ससेवाडी येथील दोन शिक्षकी शाळेला भेट दीली मात्र तेथील चित्र पाहून त्यांना धक्काच बसला कारण शाळेत केवळ विद्यार्थीच उपस्थित होते. शिक्षक कुठे आहेत? असे विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले शिक्षक अजून आलेच नाहीत. शिक्षक वेळेत उपस्थित नसल्याने चव्हाण यांनी तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.
संबंधित शिक्षकांकडे खुलासा मागितला
पुणे जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यापासून चव्हाण हे सर्व तालुक्यांमध्ये दौरा करीत आहेत. नुकताच त्यांनी भोर तालुक्याचा दौरा केला. त्यामध्ये ससेवाडी शाळेत शिक्षकच हजर नसल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ कारवाईचा आदेश दिला. ससेवाडी ही दोन शिक्षकी शाळा आहे. शाळेच्या वेळेत एकही शिक्षक उपस्थित नसून, केवळ विद्यार्थीच शाळेत उपस्थित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिसले. याबाबत, भोरच्या गटविकास अधिकार्यांनी संबंधित शिक्षकांकडे खुलासा मागितला असून, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सर्व पंचायत समिती कार्यालये, तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वच अस्थापनांना वेळोवेळी भेटी देणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील अधिकार्यांसह जिल्ह्यातील कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहिले नाही, तर कुणाची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. वेळेत उपस्थित न राहणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिला आहे.
दांडी बहाद्दरांना आवरणार का?
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात काही कर्मचारी केवळ हजेरी लावण्यासाठीच येतात. दुसऱ्या कार्यालयाचे नाव सांगून बाहेर जाण्याचे कारण सांगून पुन्हा त्यांच्या टेबलवर ते लवकर फिरकत नाहीत. परिणामी, जिल्ह्यातून त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. तसेच दिवसभर कार्यालयात उपस्थित नसणाऱ्या दांडी बहाद्दरांना सीईओ आवरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.