ऐन गर्दीच्या वेळी दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड; लोकलला लेटमार्क

मध्य रेल्वेच्या काही गाड्या उशिराने धावत असून सकाळच्या वेळी अनेक प्रवासी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यातच हा बिघाड शोधून दुरुस्त करण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले नाही, तर मध्य रेल्वेचे वाहतूक वेळापत्रक आणखी कोलमडण्याची शक्यता आहे.

    मुंबई : दादर रेल्वे स्थानकावर (Dadar Railway Station) तांत्रिक बिघाड (Technical Failure) झाल्याचे मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे मुंबईच्या (Mumbai Local) दिशेने जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. तसेच, याच तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या (Central Railway) अनेक एक्स्प्रेस (Express) रखडल्या आहेत. ऐन गर्दीच्या (Crowd) वेळी मध्य रेल्वेवर झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे कार्यालयात निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप होत आहे.

    दादर रेल्वे स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेचे वाहतूक वेळापत्रक काहीसे बिघडले आहे. मध्य रेल्वेच्या काही गाड्या उशिराने धावत असून सकाळच्या वेळी अनेक प्रवासी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यातच हा बिघाड शोधून दुरुस्त करण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले नाही, तर मध्य रेल्वेचे वाहतूक वेळापत्रक आणखी कोलमडण्याची शक्यता आहे.

    मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनीही यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. मध्य रेल्वेवरील दादर स्टेशनवर सिग्नल सुरू करताना काही तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे मेन लाइनवर गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बिघाड दुरुस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच समस्येचे निराकरण केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.