घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, १५ ते २० मिनिट उशिराने मेट्रो

सकाळच्या वेळी कामाला, कोलॅजेमध्ये किंवा इतर काही कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. अश्यावेळी सगळ्यांना आपल्या वेळेनुसार कामाच्या ठिकाणी पोहचायचं असत.

  सकाळच्या वेळी कामाला, कोलॅजेमध्ये किंवा इतर काही कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. अश्यावेळी सगळ्यांना आपल्या वेळेनुसार कामाच्या ठिकाणी पोहचायचं असत. पण आज मुंबई मेट्रोमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १५ ते २० मिनिट उशिराने येत आहे.त्यामुळे नागरिकांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागला. मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मेट्रोसाठी तात्कळत उभे राहावे लागत आहे. सकाळी गर्दीच्या वेळी मेट्रोमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना अनेक वेळ थांबुन राहावे लागले. मात्र आता मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे.

  सकाळ सकाळ मेट्रोमध्ये बिघाड झाल्याने मुंबईकरांना गर्दीचा सामना करावा लागला. घाटकोपर-वर्सोवा ही मेट्रो सेवा काही तांत्रिक कारणामुळे विस्खलित झाली होती. काहीकाळ मेट्रो सेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांना सांगण्यात आले की, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. काही वेळानंतर रखडलेली मेट्रो सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. आता घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवा चालू करण्यात आली आहे. मेट्रो बंद झाल्याने प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऐन गर्दीच्या वेळी सेवा बंद झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.

  १५ ते २० मिनिटाने उशिराने मेट्रो सेवा

  सकाळी गर्दीच्या वेळी मेट्रोमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सेवा विस्खलित झाली. याचा फटका प्रवाशांना बसला आहे. सकाळच्या वेळी कामानिमित्त किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. अश्यावेळी मेट्रो बंद झाल्याने अनेक प्रवाशांना कार्यालयात पोहचण्यासाठी उशीर झाला. सकाळी काही मेट्रो काही वेळ रखडली होती. यामुळे बरेच प्रवासी अडकून पडले.

  तांत्रिक कारणामुळे मेट्रोमध्ये बिघाड

  मेट्रोमध्ये बिघाड झाल्याने मेट्रो काही वेळ उशिराने धावत होती. मात्र मेट्रो सुरु झाल्यानंतर ही १५ ते २० मिनिट उशिराने येत आहे. अजूनही मेट्रो प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण दिले जात आहे. मेट्रो उशिरा येत असल्याने घाटकोपर मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे.