ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड; मरेची वाहतूक विस्कळीत, चाकरमान्यांचे घरी जायचे झाले वांदे

मुलुंडहून डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर येत होती तांत्रिक बिघाडामुळे ती मध्येच अडकल्याची माहिती आहे. या बिघाडामुळे डाऊन धीमी, अप धीमी आणि डाऊन जलद या तिन्ही सेवा ठप्प झाल्या आहेत.

    ठाणे : ऐन गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात (Central Railway Thane Station) तांत्रिक बिघाड (Technical Issue) झाल्याने मध्ये रेल्वेची वाहतूक कोलमडल्याने कल्याणकडे (Kalyan) जाणाऱ्या लोकल मुलुंड स्थानकावर (Mulund Railway Station) थांबवण्यात आल्या आहेत. या बिघाडामुळे काजूंरमार्ग स्थानकापर्यंत लोकल्स खोळबंल्याची माहिती मिळत आहे.

    संध्याकाळच्या वेळी घरी जाण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. या बिघाडामुळे त्यांच्यावर घरी उशीरा पोहोचण्याची नामुष्की ओढविली आहे. ठाणे स्थानकात यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून ठाणे स्थानकातून एकही लोकल गेलेली नाही. मुलुंडहून डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर येत होती तांत्रिक बिघाडामुळे ती मध्येच अडकल्याची माहिती आहे. या बिघाडामुळे डाऊन धीमी, अप धीमी आणि डाऊन जलद या तिन्ही सेवा ठप्प झाल्या आहेत.

    या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेचं वाहतूक वेळापत्रक (Time Table) काहीसं मागे पडलं आहे. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या काही गाड्या उशिराने (Late) धावत आहेत. ऐन सणासुदीच्या वेळी मध्य रेल्वेवर झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे घरच्या दिशेनं निघालेल्या चाकरमान्यांचे वांदे झाले असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे.