बाळापूरच्या शिवसेना आमदारांची टेक्निकल चूक

एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तर दुसरीकडे आमदार नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरील सही (Signature) टेक्निकल चुकीत (Technical Mistake) अडकण्याची शक्यता आहे.

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप (Political Earthquake) आणणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला (Rebellion) वेगवेगळे वळण लागणार आहे. एकीकडे शिवसेनेतील आमदार गुवाहाटीत (Guwahati) जाऊन एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. तर, पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) माघारी परतले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तर दुसरीकडे आमदार नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरील सही (Signature) टेक्निकल चुकीत (Technical Mistake) अडकण्याची शक्यता आहे.

    शिवसेना आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षड्यंत्र आहे, त्यांना राज्य सरकार अस्थिर करायचे आहे. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावरील स्वाक्षरी आपली नाही, ती बोगस आहे, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. आपली स्वाक्षरी इंग्रजीत असून त्या पत्रावर बोगस स्वाक्षरी असल्याचा आरोपही त्यांनी केला. नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरील सही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या गॅझेटियरमध्ये आमदार नितीन देशमुखांचे नाव ‘नितिन भिकनराव टाले’ असे आहे. या पत्रावरील देशमुखांची सही ‘नितीन देशमुख’ अशी मराठीत असल्याचे दिसत आहे. त्यांना नितीन देशमुख या नावाने ओळखले जाते.

    आमदार देशमुख यांनी अकोल्यात परतल्यावर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे. भाजपमध्ये धमक असेल, तर निवडणुका लावाव्या व जनतेसमोर जावे. आता निवडणूक व्हावी, अशी माझी इच्छा आहे. जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देतील. मी सच्चा शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असे ते म्हणाले होते. गटनेत्यांनी बैठक बोलावली म्हणून मी आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह एकनाथ शिंदेंकडे गेलो. आम्हाला माहित नसताना गुजरातकडे नेले. तिथे पोलिसांसोबत वाद झाले. मी तेथून पळ काढला. मला काहीच झालेले नसताना गाडीत टाकले. दवाखान्यात डॉक्टरनं अटॅक आलेला नसतानाही इंजेक्शन देण्यात आले, असे खळबळजनक वक्यव्य त्यांनी केले.