
भीमा नदीच्या पात्रात ठेहाळणी करीत थांबलेल्या ८ ते १० वाळूमाफियांनी अचानक नदी पात्रात पाहणी साठी गेलेले माढ्याचे तहसिलदार विनोद रणवरे यांना दमबाजी करीत अरेरावी केली. माढा तालुक्यातील शेवरे गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात ही घटना घडली. माढा तालुक्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढल्याचे या प्रकरणावरुन समोर आले आहे.
माढा : भीमा नदीच्या पात्रात ठेहाळणी करीत थांबलेल्या ८ ते १० वाळूमाफियांनी अचानक नदी पात्रात पाहणी साठी गेलेले माढ्याचे तहसिलदार विनोद रणवरे यांना दमबाजी करीत अरेरावी केली. माढा तालुक्यातील शेवरे गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात ही घटना घडली. माढा तालुक्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढल्याचे या प्रकरणावरुन समोर आले आहे.
टेभुर्णी पोलिस प्रशासनाच्या हद्दीत असलेल्या शेवरे भागातील अवैध वाळु तस्काराविरोधात कारवाई करायला पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अवैध उत्खननाला पोलिस प्रशासनाचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे. माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी नियुक्ती झाल्यापासून वाळूतस्कराविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. मात्र त्यांना पोलिस यंत्रणेची साथ मिळत नसल्याचे एकदंरीत चित्र दिसत आहे.
शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी बाराच्या सुमारास तहसीलदार रणवरे यांनी शेवरे भागातील भीमा नदीच्या पात्रात अचानक जाऊन पाहणी केली असता त्यांना तरुण वयोगटातील ८ ते १० जण थांबलेले दिसले. तुम्ही नदी पात्रात काय करताय ? अशी विचारणा तहसीलदारांनी केली असता ‘तुच येथे काय करतो’ अशी उद्धटपणे अरेरावी करीत त्यांना दमबाजी करण्यात आली. तहसीलदार व संबंधित वाळू तस्करांत जोरदार खंडाजगी झाली.
वाळू तस्कराची मुजोरी वाढली
तहसीलदारांची अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई सुरु असताना वाळूमािफयांचे वाळू तस्कराची मुजोरी वाढल्याचे पहायला मिळू लागले आहे. पोलिस प्रशासनाचे मात्र वाळूतस्काराविरोधात अंकुश ठेवणं गरजेचं आहे. वाळू तस्कारांविरोधात कारवाई करणाऱ्या तहसीलदारांनाच अरेरावी व दमबाजी करण्याचा प्रकार पोलिस प्रशासनाने गांभिर्याने घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त हाेत अाहे.
भीमा नदी पात्रातील शेवरे भागात वाळू उपसा होतोय का ? हे पाहण्यासाठी मी अचानक नदी पात्रात गेलो होतो. मात्र ८ ते १० जणांचे टोळके थांबले होते. त्यांना नदीपात्रात काय करताय ? याची विचारणा केली असता त्यांनी मलाच उलट अरेरावी करीत दमबाजी केली. या प्रकाराला मी भीक घालत नाही. काेणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई सुरुच राहील. महसूल प्रशासनाचे पथक देखील तैनात केले आहे.
-विनोद रणवरे, तहसीलदार माढा