दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे करणार राजकारणात एट्री? बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण

तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आता शिवसेना कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडल्याने तेजस ठाकरे हे राजकीय रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे, दसरा मेळाव्याला तेजस ठाकरे यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत, कारण, दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत झळकत असलेल्या शिवसेनेच्या बॅनसर्वर तेजस ठाकरे सुद्धा झळकत आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

    मुंबई : सध्या राज्यातील राजकारण बरेच तापले आहे. दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत (Shinde group and shivsena) चांगलीची ठिणगी उडत आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कमधील (Shivaji park) दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) दावा केल्यानंतर शिवसेनेनं कोर्टात (Court) आव्हान दिलं आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्यासाठी ठाकरे घराण्यातील आणखी एक सेनापती सज्ज झाले आहेत. मागली काही दिवसांपासून ठाकरे घराण्यातील छोटे युवराज तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने रंगता आहे. तेजस ठाकरे अधुनमधून शिवसेनेच्या व्यासपीठांवर दिसतात. त्यामुळं तेजस ठाकरेंनी सुद्धा राजकारणात यावे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, तसेच तेजस ठाकरे हे आजोबाप्रमाणे आक्रमक असल्याचं बोललं जात आहे. तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आता शिवसेना कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडल्याने तेजस ठाकरे हे राजकीय रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे, दसरा मेळाव्याला तेजस ठाकरे यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत, कारण, दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत झळकत असलेल्या शिवसेनेच्या बॅनसर्वर तेजस ठाकरे सुद्धा झळकत आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहीहंडी उत्सवावेळीही शिवसेनेच्या बॅनर्सवर तेजस ठाकरे यांचा फोटो लागला होता. यामध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख ‘हिंदुहदयसम्राट’, उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘कुटुंबप्रमुख’ तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा उल्लेख अनुक्रमे ‘युवानेतृत्त्व’ आणि ‘युवाशक्ती’ म्हणून करण्यात आला होता. त्यामुळं आता मुंबईत झळकलेल्या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला तेजस ठाकरे हे सक्रिय आणि पूर्णवेळ राजकारणात प्रवेश करतील, असं बोललं जात आहे.