temperature in nagpur

मुंबईचा पारा शनिवारी दुपारच्या सुमारास ४० अंशांवर(40 degree temperature in mumbai) पोहोचला आहे. पुढच्या काही तासांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. कोकणात सिधुदुर्ग, रत्नागिरी इथं उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.आता मुंबई आणि ठाण्यातही उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान खात्याचे के.एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली.

    मुंबईचा पारा शनिवारी दुपारच्या सुमारास ४० अंशांवर पोहोचला आहे. पुढच्या काही तासांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले आहे.

    मार्च महिन्याच्या २७ तारखेलाच तापमान ४० अंशांपर्यंत गेलं आहे. मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच ४१.७ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद १९५६च्या सुमारास करण्यात आली होती. आज अनेक वर्षांनी पुन्हा एकदा तसाच उन्हाचा तडाखा जाणवत आहे.

    सध्या राजस्थानकडून महाराष्ट्राच्या दिशेनं जे कोरडे वारे वाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी दिली आहे. काल कोकणातील काही शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहचल्याची माहिती सरकार यांनी दिली आहे. त्यामुळे शक्यतो दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडू नका, चेहरा झाकण्यासाठी रुमालाचा वापर करा, भरपूर पाणी प्या असं आवाहन सरकार यांनी केलं आहे.

    के.एस. होसाळीकर यांनी मुंबईच्या तापमानाची माहिती देण्यासोबतच सर्वांना या दरम्यानच्या काळात काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे. पुढचे काही दिवस उकाडा असाच कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.