शिक्षणात इतिहास घडवायला देवस्थानची साथ महत्वाची : उदय सामंत

शिक्षणात इतिहास घडवायला देवस्थानची साथ महत्वाची आहे. राज्यातील सर्वच मुख्य देवस्थान ट्रस्टने राज्यातील शिक्षण पद्धती आणि शिक्षण प्रणालीत प्रगती करण्यासाठी पुढाकार घेतला तर पुढील काळात शिक्षण क्रांतीचा इतिहास घडेल.

    नारायणगाव : शिक्षणात इतिहास घडवायला देवस्थानची साथ महत्वाची आहे. राज्यातील सर्वच मुख्य देवस्थान ट्रस्टने राज्यातील शिक्षण पद्धती आणि शिक्षण प्रणालीत प्रगती करण्यासाठी पुढाकार घेतला तर पुढील काळात शिक्षण क्रांतीचा इतिहास घडेल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ओझर येथील कार्यक्रमात सांगितले.

    अष्टविनायक देवस्थानपैकी प्रमुख असलेल्या ओझरच्या श्री विघ्नहर देवस्थानने उभारलेल्या गणेश पूजनातील गणपतीच्या आवडत्या २१ वनस्पतींचा समावेश असलेल्या ‘विघ्नहर उद्यान’चे उदय सामंत यांनी उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.

    शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, ओझरचे सरपंच उपसरपंच सदस्य अन्य देणगीदार यांसह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.