पुण्यातील नवले पुलानजीक टेम्पो जळून खाक

    धायरी : मुंबई-बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर पुठ्ठ्याने भरलेला छोटा हत्ती टेम्पो शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    स्वामीनारायण मंदिरासमोर येताच टेम्पोमधून धूर

    टेम्पो चालकाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी येथून पुठ्ठा भरून सातारच्या दिशेने जात असताना नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर येताच टेम्पोमधून धूर निघू लागल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला घेऊन गाडीतून उतरून बघितले असता शॉर्टसर्किट होत असल्याचे दिसून आले. बघता बघता टेम्पो ने पेठ घेऊन आगीचे लोळ बाहेर पडू लागले. लगेचच अग्निशमन दलाला तसेच सिंहगड पोलिसांना वर्दी देण्यात आली काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला मदत केली व पुढील घटनेचा तपास सिंहगड पोलीस करत आहे.