डोळ्यांदेखत आगीत होरपळून दहा जनावरांचा मृत्यू, घातपाताचा संशय

    हिंगोली (Hingoli) : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे रात्री एका गोठ्यात आग लागली. या आगीत दहा जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. सचिन बोलवार यांच्या गोठ्यात आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

    घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. परंतु आग एवढी भीषण होती की जवळ जाणे देखील शक्य नव्हते.आगीत चार म्हशी, दोन गिरगाय, दोन बैल, दोन वासर यांचा होरपळून मृत्यू झाला.