शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याला १८०० बसेससाठी १० कोटी खर्च, तर अडीच लाख फूड पॅकेटची ऑर्डर

दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी तसेच यावर राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होणार आहे, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही दसरा मेळावे व्यवस्थित पार पडावेत, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

    मुंबई : सध्या शिवसेना व शिंदे गटासमोर उद्याचा दसरा मेळावा कसा यशस्वी पार पाडायचा हाच प्रश्न आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गट व शिवसैनिक (Shivsainik) अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व उद्धव ठाकरेंची शिवसेनेला (Shivsena) कोर्टाची (Court) पायरी चढावी लागली. यानंतर शिवसेनेला दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी कोर्टानी दिली आहे. परंतू दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी तसेच यावर राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होणार आहे, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही दसरा मेळावे व्यवस्थित पार पडावेत, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

    तर दुसरीकडे शिवसेना व शिंद गट आपपल्या दसरा मेळाव्याला लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहे. बसेस, गाड्या आदी वाहनातून राज्यभरातून लोकं मुंबईत येतील असा विश्वास शिवसेना व शिंदे गटांला आहे. शिंदे गटानेही दसरा मेळाव्याचा तिसरा टिझर लॉन्च केला आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यभरातून लाखो लोक येतील असा विश्वास शिंदे गटाला आहे, त्यामुळं शिंदे गटाकडून राज्यभरातून १८०० बसेस सोडण्यात येणार आहेत, या बसेससाठी १० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. तर अडीच लाख फूड पॅकेटची ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यभरातून लोकं येणार आहेत, त्यामुळं यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी लोकांच्या प्रवासाची तसेच जेवणाची सोय शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. पण राज्यात अन्य प्रश्न असताना फक्त बसेसवर १० कोटी खर्च कशासाठी असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं कोणाच्या दसरा मेळाव्याला लोकं अधिक जमणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.