मोठी बातमी! ; एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ, २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ऐन दिवाळीत खिशावर पडणार अधिक ताण

शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.  तसेच, ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही.

    मुंबई : एसटी (MSRTC) महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ (Rent Hike) सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात (season) महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला (STATE TRANSPORT AUTHORITY) दिला असून, त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही २० व २१ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मध्यरात्रीनंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राहणार आाहे. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. (Parivartan, hirkanee, shivsahi)

    दरम्यान, शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.   तसेच, ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, असे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.