डायरेक्ट झडप घातली; कुत्र्यांच्या हल्ल्यात दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात दहा वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला. काचुरवाही येथे ही अत्यंत धक्कादायक घटना घडलीय. हंसिका गजभिये ही मुलगी घराजवळील शेतात सायकलने गेली असता ५ कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली(Ten-year-old girl seriously injured in Dog Attack).

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात दहा वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला. काचुरवाही येथे ही अत्यंत धक्कादायक घटना घडलीय. हंसिका गजभिये ही मुलगी घराजवळील शेतात सायकलने गेली असता ५ कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली(Ten-year-old girl seriously injured in Dog Attack).

    हंसिकाला तात्काळ रामटेकचा योगीराज राधाकृष्णा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तिची गंभीर स्थिती बघता तिला नागपूरच्या राधाकृष्णा हास्पिटलमध्ये हलविण्यात आले. आता तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.

    कुत्रा हा पाळीव प्राणी. पण, कधीकधी हेच कुत्रे धोकादायक ठरतात. रामटेकमध्ये अशीच एक भयानक घटना घडली. या घटनेत पाच कुत्र्यांच्या घोळक्याने निरागस मुलीवर हल्ला चढविला. तिला गंभीर जखमी केले. आता नागपुरातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.