‘मला शिव्या शाप देण्यात आल्या, मला धन्या म्हणून…’; धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

दहा वर्षांपूर्वी शिरूर कासार तालुक्यात येताना मला अनेकांनी शिव्या शाप दिल्या. मला धन्या म्हणून हिणवले गेले, माझ्यावर दगड मारले. मात्र, आज याच गडाच्या पायथ्याचे मला दगड होण्याचे भाग्य मिळाले, अशी खंत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बुधवारी (दि.24) बोलून दाखविली.

    बीड : दहा वर्षांपूर्वी शिरूर कासार तालुक्यात येताना मला अनेकांनी शिव्या शाप दिल्या. मला धन्या म्हणून हिणवले गेले, माझ्यावर दगड मारले. मात्र, आज याच गडाच्या पायथ्याचे मला दगड होण्याचे भाग्य मिळाले, अशी खंत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बुधवारी (दि.24) बोलून दाखविली.

    पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर दोघांचेही समर्थक आमनेसामने होते. यावेळी शिरूर कासार तालुक्यातील काही लोकांकडून कसा त्रास झाला हे सांगायला धनंजय मुंडे विसरले नाहीत. मुंडे भावंडं एक झाले असले तरी त्यांच्यातील सल मात्र आता भाषणातून बाहेर पडताना दिसत आहे.