कल्याणमध्ये मोकाट म्हशीचा हैदोस; चार ते पाच जणांना धडक

पिसाळलेली म्हैस पोलीस लाईन परिसरात शिरली. त्यानंतर मिलिंदनगर परिसरात धुमाकूळ घातला. यावेळी, तिने उभ्या असलेल्या गाड्यांना लक्ष्य केले. तिच्या मागावर असलेल्या कल्याण-डोंबिवली मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची परकाष्ठा करीत मिलिंदनगर परिसरातील एका चाळीचे गेट जवळ दोरखंडाचे टाकून जेरबंद केले. घटनास्थळी तातडीने पोहचत पशुवैद्यकीय आधिकारी डॉ. पानसरे यांनी तिला बेशुद्ध करून उपचार केले. त्यानंतर मिलिंदनगर येथे रवानगी केल्याने तब्बल चार तासानंतर थरार थांबला.

    कल्याण : कल्याण (Kalyan) पश्चिमेत काल संध्याकाळी चिकणघर परिसरात मोकाट म्हैस (Buffalo) लोकांना धडका देत असल्याबाबत अग्निशमन दलाला (Fire Brigade) माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ मोहिम हाती घेत चिकणघर, बिर्ला कॉलेज (Birla College) गेट परिसरात धडक देत चार ते पाच लोकांना लक्ष्य केले. या पिसळलेल्या म्हशीची प्रचंड दहशत (Dismay) निर्माण झाली होती. अथक प्रयत्नांनंतर तिला जेरबंद करण्यात यश आले आहे.

    पिसाळलेली म्हैस पोलीस लाईन परिसरात शिरली. त्यानंतर मिलिंदनगर परिसरात धुमाकूळ घातला. यावेळी, तिने उभ्या असलेल्या गाड्यांना लक्ष्य केले. तिच्या मागावर असलेल्या कल्याण-डोंबिवली मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची परकाष्ठा करीत मिलिंदनगर परिसरातील एका चाळीचे गेट जवळ दोरखंडाचे टाकून जेरबंद केले. घटनास्थळी तातडीने पोहचत पशुवैद्यकीय आधिकारी डॉ. पानसरे यांनी तिला बेशुद्ध करून उपचार केले. त्यानंतर मिलिंदनगर येथे रवानगी केल्याने तब्बल चार तासानंतर थरार थांबला.

    याबाबत नागरिकांनी अग्निशमनच्या जवानांचे आभार मानले. पिसाळलेल्या म्हैशीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेत आधारवाडी फायर स्टेशनचे इन्चार्ज विनायक लोखंडे, अग्निशमन दलाचे जवान, हेमंत आसकर, युवराज राठोड, सचिन पवार, मच्छिंद्र बोकरे, जावळे, शेमले, चंदनशिवे, लतेश पष्टे, महिला सहकारी सुप्रजा शेट्टी यांनी सहभाग घेतला होता.