राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडले, मुंब्य्रात तणाव

मुंब्रा (Mumbra) परिसरात काल रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) लावण्यात आलेले बॅनर (Banner) अज्ञातांनी फाडले (Tear). यावरून वाद (Argument) निर्माण झाला आहे. या अगोदरदेखील मनसे (MNS) कार्यालयावर दगडफेक करून बॅनर फाडले होते. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर फाडल्याने पोस्टर फाडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी इरफान सय्यद यांनी केली आहे.

    राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंब्रा परिसरातील नुराणी हॉटेल मनसे कार्यकर्त्याने बॅनर लावले होते. मात्र, हे बॅनर अज्ञातांनी फाडल्याची घटना काल रात्री घडली आहे. त्यामुळे मुंब्रा भागात तणाव वाढला आहे. या आधी झालेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यामुळे पोलिसांना कारवाई केली आहे. मात्र, काल रात्री घडलेल्या प्रकारात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. त्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करुन कारवाई करावी लागणार आहे. मुंब्य्रातील या प्रकारानंतर पोलिसांनी पोस्टर फाडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.