चंद्रपुरात भीषण अपघात, बोलेरोची ट्रकला धडक होऊन चौघांचा मृत्यू

बोलेरोतील व्यक्ती, रात्री रस्त्यावर बसलेल्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक स्टेअरिंग रॉड तुटला आणि अचानक बोलेरो बाजूच्या ट्रकवर आदळली. आणि अपघात झाला.

    चंद्रपूर : चंद्रपुरातून भीषण अपघाताची (Chandrapur Accident) बातमी समोर येत आहे. बोलोरो वाहन आणि ट्रकमध्ये धडक होऊन चौघांचा मृत्यू झाला आहे. सावली- गडचिरोली मार्गावर ही घटना घडल्याची माहिती आहे. या अपघातात गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे यांचा समावेश आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील सावली- गडचिरोली मार्गावर हा भीषण अपघात झाला. बोलेरो वाहन ट्रकवर आदळल्याने बोलेरोतील चौघे मृत्युमुखी पडले. गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे 26 याचा मृतांमध्ये समावेश असून चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी करून गडचिरोलीला हे सगळे जण परतत होते. बोलेरोतील व्यक्ती, रात्री रस्त्यावर बसलेल्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक स्टेअरिंग रॉड तुटला आणि अचानक बोलेरो बाजूच्या ट्रकवर आदळली. घटनास्थळी सावली व किसान नगर येथील नागरिकांनी पोचत पोलिसांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केलं.