मोहोळ तालुक्यातील देवडी गावाजवळ भीषण अपघात; दोघे जागीच ठार, गाडीचा चक्काचूर

रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून पिकअपने जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.१३) पहाटे ५ वाजता देवडी गावच्या शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ घडली.

    मोहोळ : रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून पिकअपने जोरदार धडक देऊन भीषण अपघात (Accident in Mohol) झाला. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.१३) पहाटे ५ वाजता देवडी गावच्या शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ घडली.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणहून सोलापूरकडे घराचे सामान घेऊन निघालेला आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. ४३ बी. आर. ५२५२ हा शुक्रवार १३ मे रोजी पहाटे ५ वाजता देवडी गावचे शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला उभा राहिला असता पाठीमागून भरधाव वेगात आलेली पिकअप गाडी क्रमांक एम. एच. २० ई एल ७२८२ या पिकअप गाडीने टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात रिजवान अब्दुल अजीज शेख (वय २२, रा. वैजापूर औरंगाबाद) व रिहान फैजल (वय ३५, राहणार झारखंड) या दोन व्यक्तींना जबर मार लागून अडकून गंभीर जखमी होऊन ते जागीच मयत झाले. तर पाठीमागे रिकाम्या कागदी बॉक्स ला धरून दोन व्यक्तीना किरकोळ मार लागून ते जखमी झाले आहेत.

    दोन्ही जखमींना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवून देण्यात आले असून, याबाबत आयशर टेम्पोचा चालक चेतन बिभीषण खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास अपघात पथकाचे ज्योतिबा पवार हे करत आहेत.