सासवड-पुणे रस्त्यावर मध्यरात्री शिवशाही एसटी बस व कंटेनरचा भीषण अपघात

सासवड पुणे रस्त्यावर मध्यरात्री शिवशाही एसटी बस व कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात बसमधील एक प्रवासी जागीच मृत्यू झाला असून, सहा प्रवासी गंभीर जखमी झाले झाल्याचे सांगण्यात आले आहे.

    पुणे : सासवड पुणे रस्त्यावर (Pune- Saswad Road)मध्यरात्री शिवशाही एसटी बस व कंटेनरचा भीषण अपघात (Accident)झाल्याची घटना घडली. अपघातात बसमधील एक प्रवासी जागीच मृत्यू झाला असून, सहा प्रवासी गंभीर जखमी झाले झाल्याचे सांगण्यात आले आहे. सोनाई हॉटेलसमोर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station)गुन्हा दाखल करण्याचे काम केले जात आहे.

    सासवड रोडवरील उरळी देवाची फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एक गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून कंटेनर सासवड रस्त्यावर आला. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने येणारी पंढरपूर-पुणे शिवशाही एसटी बस या अचानक आडव्या आलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात एसटी चालक व प्रवासी गंभीर जखमी झाले. यात बसचा समोरील भाग व कंटेनरचा चक्का चुर झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.