भीषण अपघात! एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर टक्कर, दोघांचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर

  हातकणंगले/प्रतिनिधी : इंचलकरंजीहून रामलिंग धुळोबा मंदिराकडे दर्शनाला जाणाऱ्या प्रवासी रिक्षाला एसटीची समोरासमोर धडक होऊन रिक्षातील दोघांचा मृत्यू झाला.तर रिक्षा चालक प्रशांत पेटकर व गंभीर  जखमी झाले. अपघात कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावर रामलिंग फाट्यावर सायंकाळी पाच वाजता झाला.
  एसटीची आणि रिक्षाची समोरासमोर धडक
  हातकणंगले तालुक्यातील इंचलकरंजी इथले प्रशांत पेटकर ( रा. इचलकरंजी )हे रिक्षा चालक आपली रिक्षा क्रमांक एम एच 09 जे 8989 मधून दोन महिला व दोन लहान  मुलांना  घेऊन श्रावण सोमवार निमीत्त रामलिंग धुळोबा डोंगरातील मंदिराला दर्शनासाठी जात होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान ते हातकणंगले हून कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावरून रामलिंग फाट्याकडे वळण घेत असताना कोल्हापूरहून आलेल्या कुडाळ पंढरपूर एसटीची आणि रिक्षाची समोरासमोर भीषण धडक झाली.
  यांचा अपघातात मृत्यू
  यामध्ये रिक्षा मधील ३२ वर्षीय महिला शिवानी घेवर खत्री (राहणार इचलकरंजी )आणि नववर्षीय मुलगा श्रितेज विलास जंगम ( वय वर्ष ९ )  हे दोघे जागीच ठार झाले.  तर रिक्षा चालक प्रशांत पेटकर व महिला व लहान मुलगी गंभीर जखमी झाले.
  जखमींना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल
  हातकणंगले पोलिसांनी रिक्षाचालक प्रशांत पेटकर याला उपचारासाठी तात्काळ सीपीआर मध्ये दाखल केले.  तर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मुख्य रस्त्यावरच अपघात झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त होत होती. तर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.  या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात दाखल करण्याचे काम सुरू होते.
  धोकादायक वळण ….
  सांगली कोल्हापुर रस्त्यावरून रामलिंग तिर्थक्षेत्राकडे जाण्यासाठी मार्ग आहे मात्र कोल्हापुर व सांगलीहून येणारी  भरधाव वाहनांमुळे रामलिंग कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनां मुळे नेहमीच अपघात होत असतात त्यामुळे रामलिंग फाटा येथे गतिरोधक होणे गरजेचे आहे.
  २ ) देवदर्शनापासुन काही अंतरावरच अपघात …
  आज श्रावण सोमवार निमीत्त रामलिंग येथे इचलकरंजीहून देवदर्शनासाठी हे सर्व जण निघाले होते. मात्र, रामलिंग मंदीरापासून काही अंतरावरच काळाने घाला घातल्याने देवदर्शन झालेच नाही, तर एका लहान मुलाचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
  Terrible accident ST bus and rickshaw collide head on Kolhapur Sangli National Highway Two die on the spot three seriously nryb