
ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी सोमवारी एका ३२ वर्षीय महिलेवर १६ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या आईने पोलिसांना सांगितले की, आरोपी महिला नाशिक येथील तिच्या नातेवाईकाची शेजारी असून तिला तीन मुले आहेत.
कल्याण : मुलाच्या आईच्या तक्रारीचा (Mother Complaint) हवाला देत कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील (Kolsevadi Police Station) एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला अनेकदा मुलास भेटण्यासाठी मुंबईत येत असे (Arriving In Mumbai To Meet Boy) आणि दारूच्या नशेत (Drunk) मुलाशी शारीरिक संबंध (Sexually Assaulting) ठेवत असे. तक्रारीनुसार, मुलगा शाळेत न जाता महिलेला भेटण्यासाठी नाशिकला जात असे. महिलेने त्याला आक्षेपार्ह व्हिडिओही (Offensive Video) दाखविल्याचा आरोप आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना २०१९ ते डिसेंबर २०२२ दरम्यान घडली. ही बाब मुलाच्या आईला कळताच तिने पोलिसांशी संपर्क साधला. तक्रारीच्या आधारे, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.