
मुंबईत २६ तारखेपासून रंगणाऱ्या आयपी सिझनवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. या मॅचेसपूर्वी मुंबई पोलिसांनीं सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत. या मॅचेस ज्या स्टेडियम्सवर खेळवल्या जाणार आहेत, त्या वानखेडे स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर क्रिकेटर्स ज्या हॉटेल्समध्ये थांबले आहेत, तिथल्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे(Terrorist attack on IPL matches? Police in Mumbai have been alerted and security has been beefed up outside stadiums and cricketers' hotels).
मुंबई : मुंबईत २६ तारखेपासून रंगणाऱ्या आयपी सिझनवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. या मॅचेसपूर्वी मुंबई पोलिसांनीं सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत. या मॅचेस ज्या स्टेडियम्सवर खेळवल्या जाणार आहेत, त्या वानखेडे स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर क्रिकेटर्स ज्या हॉटेल्समध्ये थांबले आहेत, तिथल्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे(Terrorist attack on IPL matches? Police in Mumbai have been alerted and security has been beefed up outside stadiums and cricketers’ hotels).
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेडे स्टेडियम, ट्रायडेंट हॉटेल आणि परिसरातील रस्त्यांची रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. २६ मार्चपासून २२ मेपर्यंत या परिसरात बॉम्बशोधक पथक, बॉम्ब निकामी करण्याचे पथक, राज्य राखीव पोलीस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान मुंबई पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सतर्कता नेहमीचीच असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही विशेष माहितीच्या आधारे हा अलर्ट देण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हा नियमित सुरक्षेचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत होणाऱ्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमापूर्वी अशा प्रकारची सुरक्षा तैनात करण्यात येते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.