लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आक्रमक; मतदारसंघातील आढावा जाणून घेण्यासाठी आजपासून बैठकांच सत्र

आजपासून लोकसभा मतदारसंघातील चाचपणी तसेच इथला आढावा घेण्यासाठी बैठकाचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला मतदारसंघातील आमदार, खासदार, पदाधिकारी, विभागप्रमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

    मुंबई – राज्यात जून २०२२ मध्ये शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. आधी आमदार, खासदार मग नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटाची वाट धरली. यानंतर दोन्ही गट अनेकवेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकिच्या धरतीवर आत्तापासूनच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे  शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून बैठका सुरु होणार आहेत. (Thackeray group aggressive in the wake of Lok Sabha elections; Meeting session from today to know the review of the constituency)

    16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा

    दरम्यान, आजपासून लोकसभा मतदारसंघातील चाचपणी तसेच इथला आढावा घेण्यासाठी बैठकाचं आयोजन करण्यात आलं आहे. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला मतदारसंघातील आमदार, खासदार, पदाधिकारी, विभागप्रमुख आदी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यावेळी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करुन आगामी रणनिती ठरवली जाणार असून, यावर खलबतं होणार आहे.

    आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार

    दुसरीकडे आज मुंबई-गोवा महामार्गाबाबत या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके सभागृहात मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे. मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. राज ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मनसेप्रमुख या निर्धार मेळाव्यात काय बोलतात, या महामार्गाबाबत अल्टिमेटम देतात की, आणखी काही भूमिका घेतात, किंवा मनसैनिकांना काही आदेश देतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.