
खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकरांची खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी होणार आहे. खासदार गजनान किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकरांची खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी होणार आहे.
मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. कारण मुंबई महानगरपालिकेतील (Brihanmumbai Municipal Corporation) कथित खिचडी घोटाळा प्रकरणात (Khichdi Scam Case) मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Economic Offenses Branch) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांचीही याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यामुळं ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (thackeray group leader amol Kirtikar to be questioned in khichdi scam case)
ठाकरे गटाला धक्का…
कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकरांची खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी होणार आहे. खासदार गजनान किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकरांची खिचडी घोटाळा प्रकरणात चौकशी होणार आहे. अमोल किर्तीकर हे ठाकरेंचे उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार आहे तर गजनान किर्तीकर हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांच्या चौकशा सुरु आहेत.
किती जणांवर गुन्हे दाखल
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता अमोल किर्तीकरांची देखील चौकशी होणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा झाल्याचं भाजपा नेते किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. यामध्ये मागील आठवड्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची देखील दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली होती.