‘किरीट सोमय्या यांचा गेम भाजपच्याच लोकांनी केला’; सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा

'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शब्द पाळत नाही. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केव्हा जातील नेम नाही. कारण पुढे अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदी बसतील की काय माहिती नाही. तर किरीट सोमय्या यांचा गेम त्यांच्याच भाजपच्या लोकांनी केला', असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.

    अमरावती : ‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शब्द पाळत नाही. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केव्हा जातील नेम नाही. कारण पुढे अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदी बसतील की काय माहिती नाही. तर किरीट सोमय्या यांचा गेम त्यांच्याच भाजपच्या लोकांनी केला’, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.

    सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘देवेंद्र फडणवीस यांना का घाई होती सांगायचची का व्हिडिओ त्यांचाच आहे. भाजप केवळ उपयोग करते. उपयोग झाला की फेकून दिला जसा किरीट सोमय्याला फेकून दिलं’, असा आरोप सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला.

    तसेच सुषमा अंधारे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील टीका केली. हनुमान चालीसा मातोश्रीवर म्हणण्याची काय आवश्यकता आहे तर त्यांना हनुमान चालीसा येत नाही व पाठ नाही, असा घणाघात त्यांनी केला. धर्म नावाची गोष्ट भाजपसाठी राजकारणाचं साधन आहे, अशी टीकाही त्यांनी केली.