ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या अडचणी वाढणार; ‘या’ प्रकरणी ईडीची घरावर धाड

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे.

    मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनेकदा नोटीस धाडली होती. अशी माहिती तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
    किरीट सोमय्यांचे आरोप
    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यामुळे रवींद्र वायकर लवकरच तुरुंगात जातील, असा इशाराही सोमय्या यांनी अनेकदा दिला होता. परंतु, वायकर यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, आज ईडीच्या पथकाने वायकर यांच्या घरावर धाड टाकून निर्णायक कारवाईच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.