ठाकरे गट – शिंदे गटाच्या वकीलामध्ये निवडणूक आयोगासमोर जोरदार खडाजंगी, वाचा प्रत्येक अपडेट…

युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? प्रश्न विचारला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात निवडणूक आयोगासमोरच वाद झाला. कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या युक्तिवादावरुन महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला.

  नवी दिल्ली – शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला? यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात आज एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाची घमासान लढाई सुरू आहे. पुन्हा या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात आजची महत्त्वपूर्ण सुनावणी चालू असून आज जवळपास 1 तास 10 मिनीटं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ते केंद्रीय निवडणूक आयोगातून निघून गेले. त्यानंतर ठाकरे गटाचेच देवदत्त कामत हे युक्तिवाद करीत आहेत. द्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

  कामत – जेठमलानी यांच्यात खडाजंगी
  युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? प्रश्न विचारला. यादरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्यात निवडणूक आयोगासमोरच वाद झाला. कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या युक्तिवादावरुन महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. यानंतर निवडणूक आयुक्तांनी मध्यस्ती केली व देवदत्त कामत यांचा युक्तिवाद पूर्ण ऐकून घेऊ असे आयोगाने म्हटले.

  आयोगाने जेठमलानींना मुद्दे मांडताना थांबवले
  ठाकरे गटातर्फे आज कपिल सिब्बल यांनी सुमारे एक तास दहा मिनिटे युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे महेश जेठमलानी यांना युक्तिवाद करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. ठाकरे गटाचा पूर्ण युक्तिवाद होऊ द्या त्यानंतर युक्तिवाद करावा असे सुचित केल्यानंतर सिब्बल यांच्यानंतर आता ठाकरे गटाकडून देवदत्त कामत हे युक्तिवाद करीत आहेत.

  शिंदे गटाचे राहुल शेवाळे आयोगात दाखल
  शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दीड तासांपासून सुनावणी सुरू असताना राहुल शेवाळे हे सुनावणीच्या अंतीम टप्प्यात केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत.