is the Hinduism of those who beat women acceptable to the BJP and the rss says uddhav thackeray in vajramuth sabha nagpur nrvb

राम मंदिर उद्घाटन सोहळा नव्या वर्षात २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या भव्य सोहळ्यासाठी देशभरातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. अशातच आता महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलेलं नाही ,अशी माहिती मिळत आहे. यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

    राम मंदिर उद्घाटन सोहळा नव्या वर्षात २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या भव्य सोहळ्यासाठी देशभरातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. अशातच आता महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलेलं नाही ,अशी माहिती मिळत आहे. यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी राम मंदिराच्या उभारणीत ठाकरे गटाचं योगदान काय असा सवाल विचारला. तर, उद्धव ठाकरे हे सरकारच्या व्हीव्हीआयपी यादीत नसल्याने त्यांना आमंत्रण मिळालं नसेल असंही सांगितले. यावरून ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

    “आम्हाला निमंत्रण येवो अथवा न येवो, तो आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. इव्हेंट करणारी जी लोक आहेत, त्यांनी त्या काळात पळपुटेपणा केला. ज्यांना लालकृष्ण अडवाणींची आठवण होत नाही, विश्वहिंदू परिषदेचा उल्लेख होत नाही. अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करायची? असं सचिन अहिर म्हणाले.

    ते पुढे म्हणाले, “राम मंदिर त्यांनी घडवलेलं नाही. राजकीय पक्ष म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी परखड भूमिका मांडली होती. या विषयाला चालना देऊन सांगितलं होतं की लोकसभेत हे बिल आणा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे. परंतु, आता इव्हेंट करत आहेत, जसं काय यांनीच तिथे जाऊन विटा लावल्या आहेत. आम्हाला अभिमान आहे की राम मंदिर उभं राहतंय. मात्र, आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर जायचो तसं भविष्यात जाणार आहोत”, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.