
मागील आठवड्यात आदित्य ठाकरेंवर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप झाले. या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात येणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर (Uddhav Thackeray, Sanjay Raut, Milind Narvekar) नागपुरात येणार आहेत.
नागपूर : नागपुरात शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात सामान्यांचे प्रश्न मांडले जात असतात, मात्र या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येत कुरघोडी व सूडाचे राजकारण करताना दिसत आहेत. या हिवाळी अधिवेशनात सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा हे मुद्दे असतानाच, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण सत्ताधाऱ्यांनी लावून धरले आहे. यावरुन विरोधक व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी सुरु आहे. रिया चक्रवतीच्या मोबाईलमध्ये AU असा उल्लेख आढळल्यामुळं आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. यावर एसआयटी चौकशीचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावरुनच सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरलं आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांचा समाचार घेण्यासाठी आज अख्खी ठाकरे सेना नागुपरात दाखल झाली असून, आदित्य ठाकरेंवरील आरोपांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उत्तर देणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात आदित्य ठाकरेंवर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप झाले. या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात येणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर (Uddhav Thackeray, Sanjay Raut, Milind Narvekar) नागपुरात येणार आहेत. यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरणार असून, आदित्य ठाकरेंवर झालेले बिनबुडाच्या आरोपानंतर उद्धव ठाकरे विरोधकांवर तोफ डागणार असल्याची शक्यता आहे.
आज सीमावादावरुन देखील विरोधक आक्रमक होणार असून, कर्नाटक सरकारच्या विरोधात ठराव मांडण्यास सरकारला भाग पाडू असं विरोधकांनी म्हटलं आहे, तर दुसरीकेड आदित्य ठाकरेंवरील आरोपांना उत्तर देण्यासाठी ठाकरे सेना नागपूरमध्ये येणार आहे. उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आमची सेना लेचापेचा, पळपुट्यांची नाही. धमक्या द्या, तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.