औरंगाबादमध्ये शिंदे गटाची बाजी, तर सोलापुरात ठाकरे गटाला पंसती

पैठण तालुक्यातील एकूण ७ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. तर पश्चिम मंतदारसंघातील औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूजच्या वडगाव कोल्हाटी आणि बजाजनगर ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने आपले प्रभुत्व दाखवत शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज केल्याचे दिसून येत आहे. तर सोलापुरात मात्र ठाकरे गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्व सात जागा जिंकल्या आहेत.

    औरंगाबाद- औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आणि संदिपान भुमरेंनी उद्धव ठाकरे गटाला चांगलाच धोबीपछाड दिला आहे.

    पैठण तालुक्यातील एकूण ७ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. तर पश्चिम मंतदारसंघातील औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूजच्या वडगाव कोल्हाटी आणि बजाजनगर ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने आपले प्रभुत्व दाखवत शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज केल्याचे दिसून येत आहे. तर सोलापुरात मात्र ठाकरे गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्व सात जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याने ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

    पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटासोबत संघर्ष सुरू असताना पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिले यश मिळाले आहे. सोलापूरमधील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. या निकालाने सोलापुरात वर्चस्व असणारे माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.

    अमर पाटील यांच्या गटाने ही विजयश्री खेचून आणली आहे. ते माजी आमदार रतिकांत पाटील यांचा मुलगा आहेत. त्यांनी हत्तूर जि. प. निवडणुकीत २०१७ ला विजय मिळवला होता. त्यांचा चिंचपूर गटात दबदबा आहे. तसेच जनसंपर्कही आहे. याचाच फायदा त्यांना चिंचपूर ग्रामपंचायत निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे.