मोदींसोबतचे संबंध जपण्याला ठाकरेंची तयारी होती, पण…. केसरकरांचा गौप्यस्फोट

शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन करून महिना उलटला आहे. मात्र, शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेना यांच्यातून विस्तवही जात नसल्याचे राज्यात चित्र आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे यांची तयारी होती, पण नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्याने ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.

    मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटण्याचे कारण सांगून गौप्यस्फोट (Secret Explosion) केला आहे. यामुळे राजकीय शाब्दीकयुद्ध रंगणार आहे. राज्यातील सत्तापालट झाल्यानंतर वादाच्या फैरी सुरू असतानाच केसरकर यांनी युतीबाबत माहिती दिली आहे.

    शिंदे गट आणि भाजपने (BJP) राज्यात सरकार स्थापन करून महिना उलटला आहे. मात्र, शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेना यांच्यातून विस्तवही जात नसल्याचे राज्यात चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या वतीने दीपक केसरकर हे प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. पंतप्रधान मोदींसोबत असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे यांची तयारी होती, पण नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्याने ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.

    भाजप आणि शिवसेनेत बोलणी सुरु असताना भाजपच्या १२ आमदाराचं निलंबन झालं. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले. यानंतर नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. यावर उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे अनेक शिवसेना कार्यकर्तेही नाराज झाले. राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची बदनामी केली. भाजप आणि शिवसेनेतील संबंध सुधारण्याची उद्धव ठाकरेंची तयारी होती. पण नंतरच्या काळात वेळेअभावी ते झालं नाही आणि संबंध आणखी बिघडले, असे केसरकर म्हणाले.