रेल्वे प्रवाशांच्या खिशातून मोबाईल चोरणारे दोन चोरटे गजाआड

चोरी केलेला मोबाईल रेल्वे पोलिसांनी हस्तगत केला आहे. हे दोघेही मोलमजुरी करत उदरनिर्वाह करायचे. मात्र झटपट पैसे मिळवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा चोरी केली आणि पोलिसांच्या तावडीत सापडले.

    रेल्वेत चढता उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन रेल्वे प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम कांबळे, सुमित जाधव असा या दोन्ही चोरट्यांचे नाव आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल रेल्वे पोलिसांनी हस्तगत केला आहे. हे दोघेही मोलमजुरी करत उदरनिर्वाह करायचे. मात्र झटपट पैसे मिळवण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा चोरी केली आणि पोलिसांच्या तावडीत सापडले.

    आंबिवली रेल्वे स्थानकावर रेल्वे लोकल येताच लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या एका प्रवासाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना सात तारखेला घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबरींनी दिलेल्या माहितीच्या आधारे आंबिवली परिसरात सापळा रचत दोन जणांना अटक केली. प्रेम कांबळे, सुमित जाधव अशी दोन चोरट्यांची नावे आहेत. हे दोघे मजुरी करतात. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात त्यांनी चोरीचा मार्ग पत्करला. पहिल्यांदाच त्यांनी चोरी केली आणि ते पोलिसांच्या तावडीत सापडले.