
महाराष्ट्रात गरिबांना आता किंमतच नाही. ग्रामीण भागातील मुलं मेहनत करून स्वप्न बघतात. मी पोलीस बनेन, अधिकारी बनेन. त्यांनी आता काय करायचं?
जितेंद्र आव्हाड – ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रामधील तरुण पिढीचं भविष्य उमलत्या कळीच्या हाताने कुस्करण्या सारख आहे. नऊ कंपन्यांची माहिती घ्या. यातील ४ कंपन्या फ्रॉड मध्ये आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवरती कामाची महाराष्ट्राची जबाबदारी असते. कॉन्ट्रॅक्टमध्ये अशी जबाबदारी निश्चित करु शकता का? त्यांना कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा मिळणार का? आरक्षण त्यांना मिळणार का? कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणजे गरिबांना नोकरीतून बाजूला काढण्याचा प्लॅन आहे. महाराष्ट्रात गरिबांना आता किंमतच नाही. ग्रामीण भागातील मुलं मेहनत करून स्वप्न बघतात. मी पोलीस बनेन, अधिकारी बनेन. त्यांनी आता काय करायचं? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला आहे.
पुढे ते म्हणाले, उद्या ब्रिज बांधायला कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी घेतले आणि ब्रिज पडला जबाबदारी कोणाची? हा संपूर्ण जगाचा प्रश्न आहे आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर विरुद्ध जगात माहौल आहे. पर्मनंट जॉब दिल्याशिवाय चांगलं काही घडू शकत नाही. एक पिढीचं जीवन उद्धवस्त करताय तुम्ही. महाराष्ट्रतील तमाम तरुणांना मी सांगतो याविरोधात रस्त्यावर उतरा. आम्ही तर सोबत आहोतच, वेळ आली तर स्वतः शरद पवारही तुमच्या सोबत चालतील. ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ ४८ तासांत जीआर काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द करू. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला आमचा विरोध आहे. तुम्ही नवीन पिढीचं आयुष्य बरबाद करत आहात. यांच्या अशा आकांशांचं वाटोळं होणारे, त्यामुळे मराठी तरुणांचा गळा घोटणारी ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती आम्ही होऊ देणार नाही. कंत्राटी कामगार म्हणजे तरुण पिढीचं कोमललेलं आयुष्य कुस्करण्याचा प्रयत्न अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केली आहे.
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, सर्व कंत्राटी कंपन्या फ्रॉड आहेत. कंत्राटी कामगार म्हणजे गरिबांना बाजुला करण्याच काम. भरतीसाठी ते स्वप्न बघून तयारीला लागतात, मेहमत घेतात. कंत्राटी कामगारला जगातून विरोध आहे. कंत्राटी कामगारांची जबाबदारी कोणाची? पुढच्या पिढीचं आयुष्य बरबाद करत आहात. रस्त्यावर उतरा मी, आम्ही तुमच्या सोबत आहोत. गरज लागल्यास शरद पवार तुमच्यासाठी रस्त्यावर चालतील. आम्ही हे होऊ देणार नाही. आमचं सरकार आल्यास २४ तासात कंत्राटी भरती पद्धत बंद करू, जीआर रद्द करु. तरुणांना सळसळत रक्त घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी जनतेला सांगितले.