जागर यात्रा काढावी, गाजर यात्रा काढू नये, राजू पाटलांचे प्रत्युत्तर, श्रीकांत शिंदेंवर निशाणा

अनेक डॉक्टर प्रशासन हे राजकारणात आहेत. तरीसुद्धा अजुनपर्यत लोकांच्या समस्येची नस त्यांना सापडलेलीच नाही हे दुर्देव, मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे

    ठाणे : कल्याण ग्रामीण विधानसभेत त्यांनी जागर यात्रा काढावी, गाजर यात्रा काढू नका. काही कमी असेल तर यात त्यांनी मला दाखवावे मी पण त्या यात्रेत सहभागी होणार. काही लोकांची सवय असते. चार वर्षे बरमूडा घालून बसतात. शेवटच्या वर्षी निवडणूका आल्या की बाहेर पडतात आणि ते आत्ता बाहेर पडले आहेत. निवडणूका जवळ आल्या की काही तरी विषय घेऊन बोंबलायचं अशी काही लोकांची पद्धत आहे, अशी टिका मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजप नेत्यांवर केली आहे. सोशल मिडियावर कल्याण ग्रामीण विधानसभेत भाजप जागर यात्रा काढणार आहे अशी पोस्ट फिरत आहे. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    मनसे आमदार राजू पाटील यांनी आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची आज सायंकाळी भेट घेतली. रिंग रोडचे डिमार्केशन, फेरीवाल्याचा विषय, रस्त्यावरील खड्डे, २७ गावातील कामगारांना ४९९ कर्मचाऱ्यांचे किमान वेतनाची थकबाकी असल्याचे बाकी असल्याचे सांगितले आहे. भेटी दरम्यान कामगाराचा विषय मी करतो. रिंग रोडची अलायमेंट हेदूटणे पासून ते कोपर पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनेक बेकायदा बांधकामे झालेली आहेत. एमएमआरडीए आणि महापालिका यांच्या समन्वय नसल्याने बऱ्याचशा समस्या आहेत.

    सर्व प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक अधिकारी नेमा. माणकोली ब्रीजचा जसा प्रकार घडला, तसा प्रकार घडू नये यासाठी अधिकारी नेमणे गरजेचे आहे. फेरीवाल्याचे सर्वेक्षण झालेले आहे. दहा हजार फेरीवाल्यांना जागा दिल्या जाणार आहेत. रिक्षांची कोंडी होते. ती दूर करण्यात यावी. अनेक डॉक्टर प्रशासन हे राजकारणात आहेत. तरीसुद्धा अजुनपर्यत लोकांच्या समस्येची नस त्यांना सापडलेलीच नाही हे दुर्देव, मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे

    मृतदेहावर बोलून राजकारण करणे मला योग्य वाटत नाही ती यात्रा होती, ती मृत पावलेल्या प्रशासनाचे प्रतिक होते. अशा गोष्टीवर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. मी सुद्धा कोविड काळात एक रुग्णवाहिका दिली हाेती. रस्त्यावर दिसत नाही, परिस्थिती काय आहे ते पाहा. प्रशासन पण हलगर्जीपणा करते. आरोग्याच्या बाबतीत सगळा सावळा गाेंधळ आहे. अनेक डॉक्टर प्रशासन आणि राजकारणी आहेत. त्यांना लोकांच्या समस्यांची नस सापडलेलीच नाही हे दुर्दैव आहे असे बोलून त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता आमदार पाटील यांनी टिका केली आहे.

    कंत्राटात फायदा, केडीएमसीचा कोविड घोटाळे का काढले जात नाही असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर भरती ही कंत्राटदारी पद्धतीने केली जाते या प्रश्नावर आमदार राजू पाटील यांनी कंत्राटामध्ये जास्त पैसे कमावता येतात म्हणून ते कंत्राटच देतात. कोविड काळात जी कंत्राटे आली. आज मुंबईतील कोविड घाेटाळे काढले जातात. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीचे का काढले जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. लोकसभेच्या ११ जागांसाठी मनसेची चाचपणी सुरु आहे. मनसे किती जागा लढविणार आहे या प्रश्नाला उत्तर देताना आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, माझ्या पक्षापूरते बाेलायचे झाले तर ११ लोकसभा संघटन बांधण्याकरीता दिल्या आहेत. माझी कल्याण आणि भिवंडीमध्ये संघटक पक्ष बांधणीकरीता माझी नियुक्ती केली आहे. जागार यात्रा नसती तर त्या बैठका झाल्या असता.