ती इमारत आणि जागा मराठा समाज सेवा संघाच्याच मालकीची!

सन १९५२ साली स्थापन झालेल्या मराठा समाज सेवा संघाच्या स्वमालकीच्या जागेत पुर्वी अनेक वर्षे विद्यार्थ्यांसाठी मराठा बोर्डिंग चालवण्यात येत होते.

    राजापूर नगर परिषद हद्दीत मराठा समाज सेवा संघाच्या मराठा बोर्डींग इमारती लगत संरक्षक भिंतीचे काम सुरु आज. त्याच्या खोदाईतून निर्माण झालेली माती ही मराठा समाज सेवा संघाने स्वमालकीच्याच इमारतीजवळ ठेवल्याने त्यातुन अन्य कुणाचेही नुकसान होण्याची सुतराम शक्यता नाही. त्या संदर्भात सुप्रिया खानविलकर यांनी नगर परिषदेकडे केलेली तक्रार ही तथ्यहीन असल्याची माहिती मराठा समाज सेवा संघाचे प्रभारी अध्यक्ष प्रकाश पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

    सन १९५२ साली स्थापन झालेल्या मराठा समाज सेवा संघाच्या स्वमालकीच्या जागेत पुर्वी अनेक वर्षे विद्यार्थ्यांसाठी मराठा बोर्डिंग चालवण्यात येत होते. या मराठा समाज सेवा संघाच्या दोन इमारती असुन एक बोर्डींगची व दुसरी भटारखान्याची इमारत आहे. या दोन्ही इमारतींच्या असेसमेंट सदरी मालक म्हणून मराठा समाज सेवा संघाचेच नाव दाखल असुन या दोन्ही इमारती मराठा समाज सेवा संघाच्याच ताब्यात आहेत.

    नगरपरिषद येथील संरक्षक भिंतीचे काम करत असताना निर्माण झालेली माती मराठा समाज सेवा संघाच्या सर्व सदस्य व पधाधिकाऱ्यांनी जागेचे सपाटीकरण करण्यासाठी स्वमालकीच्या इमारतीलगत ठेवली आहे. त्यामुळे त्या मातीमुळे अन्य कुणाचेही नुकसान होण्याची सुतराम शक्यता नाही. ज्या जागेत माती ठेवण्यात आली आहे ती जागा व इमारत मराठा समाज सेवा संघाच्या स्वमालकीच्या असुन यामध्ये अन्य कुणाचाही कसलाही संबंध नसल्याची माहिती प्रभारी अध्यक्ष प्रकाश यशवंत पवार यांनी दिली आहे. यावेळी सचिव विनोद पवार, खजिनदार प्रशांत पवार, ॲड. गुरुदत्ता खानविलकर, ॲड. राहुल राणे, हर्षदा खानविकर, विनायक सावंत, प्रकाश आमकर, जयवंत राठोड, शहाजीराव खानविलकर, जगदीश पवार, ॲड. सुशांत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.