मंगळवेढा पोलीस ठाणे आवारात संरक्षणासाठी धावत आलेले हेच ते वानर छायाचित्रात दिसत आहे. (छाया-शिवाजी पुजारी,मंगळवेढा)
मंगळवेढा पोलीस ठाणे आवारात संरक्षणासाठी धावत आलेले हेच ते वानर छायाचित्रात दिसत आहे. (छाया-शिवाजी पुजारी,मंगळवेढा)

मंगळवेढा शहरात श्री गणरायाच्या आगमनाची धांदल सुरु असतानाच दोन कुत्रे पाठीमागे लागल्याने स्वसंरक्षण घेण्यासाठी ते हनुमानचे भक्त अर्थात वानर चक्क पोलीस स्टेशन मध्ये उड्या मारत धावत आले व त्याने उपस्थित असलेले खाकी वर्दीतील पोलीस व होमगार्ड पाहून आपल्या सुटकेचा निश्वास सोडला.

    मंगळवेढा  : मंगळवेढा शहरात श्री गणरायाच्या आगमनाची धांदल सुरु असतानाच दोन कुत्रे पाठीमागे लागल्याने स्वसंरक्षण घेण्यासाठी ते हनुमानचे भक्त अर्थात वानर चक्क पोलीस स्टेशन मध्ये उड्या मारत धावत आले व त्याने उपस्थित असलेले खाकी वर्दीतील पोलीस व होमगार्ड पाहून आपल्या सुटकेचा निश्वास सोडला.

    या घटनेची हकीकत अशी, आजपर्यंत समाजामध्ये भांडणतंटा झाल्यानंतर नागरिक न्यायासाठी व संरक्षणासाठी पोलीसांकडे येतात, मात्र मंगळवार रोजी एक चक्क वानरच मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या आवारात स्वसंरक्षणासाठी दाखल झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मंगळवार दि.19 रोजी श्री गणरायाचे आगमन होत असल्याने शहरात गणेश भक्त व मंडळाचे पदाधिकारी गणरायाला आणण्याच्या धांदलीत असताना दुपारी 12.10 वाजता चक्क हनुमानचे भक्त अर्थात वानर पंढरपूर रोड वरत्या वानराच्या पाठीमागे दोन कुत्री लागल्याने जीवाच्या आकांताने धावत… धावत… पोलीस स्टेशन मध्ये आले. यावेळी बंदोबस्त कामी उपस्थित असलेले खाकी वर्दीतील पोलीस व होमगार्ड यांना पाहून आपल्याला खात्रीने संरक्षण मिळेल या विचाराने टनकन उडी मारुन पोलीस स्टेशन जवळ लावलेल्या मोटर सायकलवर जावून बसले. उपस्थित असलेल्या एका होमगार्डने या वानराची केवीलवानी अवस्था पाहून स्वत:चा जेवणाचा आणलेला डबा सोडून त्यामधील चपाती खाऊ घातली. जीवाच्या भितीपोटी भेदरलेल्या वानराने पोलीस स्टेशन हे संरक्षणाचे ठिकाण ओळखून अनेक तास तेथेच ठिय्या मांडला. अनेकांनी पुन्हा त्या वानराला मनसोक्त खाऊ घातले, पाणी पाजले. त्याच बरोबर बघ्यांची गर्दीही वाढत गेली. दरम्यान पोलीस स्टेशन मध्ये स्वसंरक्षणासाठी नेमके वानर अवतरल्याने याचे मात्र अनेकांना आश्चर्य वाटले. या घटनेची नागरिकामधून खमंग चर्चा दिवसभर सुरु होती.