
ऑनलाईन अॅपद्वारे ओळख झालेल्या मुंबईच्या तरुणीने पुण्यातील तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने बदनामी करण्याची व आत्महत्या करुन गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे : ऑनलाईन अॅॅपद्वारे (Online App) ओळख झालेल्या मुंबईच्या तरुणीने पुण्यातील (Pune) तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने बदनामी करण्याची व आत्महत्या करुन गुन्ह्यात (Crime) अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतील कळंबोली येथील एका ३० वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण व तरुणीची स्टार मेकर ऑनलाईन अॅपद्वारे ओळख झाली होती. नंतर या तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्या कल्याणीनगरमधील घरी तिचे येणे जाणे सुरु झाले. त्यातून त्यांचे शारीरीक संबंध देखील प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र, तरुणीने तरुणाची व त्याच्या नातेवाईकांचा मानसिक छळ सुरू केला. तर, ऑफिसमधील लोकांकडे व नातेवाईकांकडे बदनामी करेल, तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करुन तुला व तुझ्या घरच्यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवून टाकेन, मी आत्महत्या करेल, अशी धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली. ५ लाख रुपयांची खंडणी मागत असल्याने सततच्या छळाला कंटाळून तरुणाने शेवटी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.