जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा; उद्धव ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या बीकेसी येथील सभेत केलेल्या घणाघाती टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे भाषण संपताच काही मिनिटांतच ट्विट केले.

  मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या बीकेसी येथील सभेत केलेल्या घणाघाती टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे भाषण संपताच काही मिनिटांतच ट्विट केले. या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.

  तसेच ‘जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा’, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना आणि भाजपमध्ये नव्याने वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

  देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

  सर्वत्र पळापळ अन् गदारोळ,नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…

  अरे छट हा तर निघाला…आणखी एक ‘ #टोमणे बॉम्ब’…

  जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!!