
आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या फिर्यादीची पोलीस तक्रारच ऐकून घेत नसल्याचे पाहून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे दाद मागितली. त्यानंतर, अटक न करता विषय सांभाळून घेतो असे आश्वासन देऊन देवळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बापूराव मेंढे यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली.
देवळी : आरोपीला अटक न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तीन हजार रुपयांची लाच मगितल्याची घटना समोर आली आहे. लाचलुचपत विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताना मंगळवार १० मे रोजी रात्रीच्या दरम्यान रंगेहात अटक केली आहे. देवळी शहरात दोन व्यक्तीमध्ये वाद झाल्याने एकमेकाविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या. आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या फिर्यादीची पोलीस तक्रारच ऐकून घेत नसल्याचे पाहून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे दाद मागितली.
त्यानंतर, अटक न करता विषय सांभाळून घेतो असे आश्वासन देऊन देवळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बापूराव मेंढे यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली. शहरातील पोलीस ठाण्यासमोरील हनुमान मंदिर परिसरात हा सापळा रचण्यात आला. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बापूराव मेंढे याला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.