Shocking type in Wasmat sub-district hospital! The autopsy was carried out in the Accident Department, where the patient was in a state of panic overnight.

एका अपघातामध्ये गणपत शिरसे या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, शवविच्छेदन करण्यासाठी हा मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणल्या गेला. तर, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी हा मृतदेह चक्क उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या अपघात विभागात ठेवाला.

    हिंगोली : हिंगोलीमधील वसमतमधील उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शवविच्छेदन करण्यासाठी आणलेला एक मृतदेह चक्क अपघात विभागात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार या रुग्णालयात समोर आला आहे. तर, विशेष म्हणजे हा मृतदेह रात्रभर याच विभागात ठेवण्यात आला होता. यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना एक संपूर्ण रात्र भीतीच्या सावटात काढावी लागली आहे.

    एका अपघातामध्ये गणपत शिरसे या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर, शवविच्छेदन करण्यासाठी हा मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणल्या गेला. तर, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी हा मृतदेह चक्क उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या अपघात विभागात ठेवाला. या प्रकरणाचे स्पष्टीकरण देतांना शवविच्छेदनगृहामध्ये लाईट नाही तसेच शीतपेटी सुद्धा बंद आहे. त्यामुळे, हा मृतदेह अपघात विभागात ठेवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  या प्रकारामुळे वसमत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.